OPSU – 1 Course
OPSU – 1 Course
मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र पोलीस दलातील ज्या पोलिस उपनिरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस उपनिरीक्षक पदावर सेवेची दहा वर्षे पूर्ण केले आहेत अशा पोलीस उपनिरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकरिता प्रत्यक्ष बारा दिवसाचे दोन आठवड्याचे सत्र क्रमांक एक चे प्रशिक्षण दिनांक 7-2-2022 ते 19- 2- 2020 या कालावधीमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र , खंडाळा येथे सुरू झाले आहे. सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन दि 7 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वा. मा श्री संजय पांडे, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते तसेच माननीय श्री संजयकुमार अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके मुंबई यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 85 सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान दररोज सकाळी सहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत बाह्यवर्ग प्रशिक्षण देण्यात येते. त्यामध्ये चालणे योगा आणि प्राणायाम हे प्रशिक्षणार्थीना शिकविले जाते. प्रशिक्षणार्थी चे शारीरिक आरोग्य चांगले राहावे याकरिता योगा, चालणे वगैरे च्या माध्यमातून शारीरिक दृष्ट्या त्यांच्या व्यावसायिक कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी बाह्यवर्ग प्रशिक्षण समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान खेळ, ड्रिलसराव किंवा वर्किंग घेण्यात येते.

सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आंतर वर्ग प्रशिक्षण देण्यात येते . त्यामध्ये सविस्तर अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे . सदर आंतर वर्ग प्रशिक्षणामध्ये गुप्तवार्ता मिळवणे, नवनवीन कॉन्टॅक्ट प्रस्थापित करणे याबाबतचे मार्गदर्शन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून करण्यात येणार आहे. शरीरा विरुद्ध व मालमत्ते विरुद्ध चे गंभीर गुन्हे न्यायालयात निर्दोष का सुटतात याबाबत ची न्याय निर्णयाचा अभ्यास करून, कारणमीमांसा करून सदर गुन्ह्याच्या तपासात राहून गेलेल्या त्रुटी परत होणार नाहीत याबाबत प्रशिक्षणार्थींना माहिती देऊन तपासाचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो. तसेच आर्थिक गुन्हे, महिला व लहान मुलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास कसा करावा याबाबत माहिती देऊन सदर विषयावरील न्यायालयातून निर्दोष सुटलेल्या न्याय निर्णयावर प्रशिक्षणामध्ये चर्चा करण्यात येते . सदर प्रशिक्षणामध्ये CCTNS, AMBIS प्रणाली, सायबर क्राईम, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न हाताळणे, प्रतिबंधात्मक कारवाई ,पोलीस स्टेशन मॅनेजमेंट, संवाद कौशल्य, आरोपीकडे विचारपूस करण्याचे कौशल्य ,मीडिया मॅनेजमेंट, ई-लर्निंग, पोलीस कोठडीतील मृत्यू ,फायनान्शियल मॅनेजमेंट, अशा विविधांगी विषयावर पोलिस अधिकाऱ्यांना संबंधित क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे एकंदरीत पोलिस अधिकाऱ्याची व्यवसायिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण सत्र सुरू करण्यात आलेले आहे. सत्र क्रमांक एक च्या यशस्वी आयोजन आनंतर महाराष्ट्र पोलीस दलातील उर्वरित पोलिस अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने सदरचे दोन आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणात मधुन प्रशिक्षणार्थी ची व्यावसायिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणादरम्यान निश्चित करण्यात आलेल्या विषयांमध्ये तज्ञ असलेल्या व्यक्तीकडून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.