Skip to content

Recruit Police Constable

Home | Recruit Police Constable

Recruit Police Constable

नवप्रविष्ठ  महिला पोलीस प्रशिक्षणार्थी पोलीस षिपाई याच्या करीता प्रशिक्षण कालावधीतील आचार संहिता

 

संदर्भ क्रमांकः-

 1) महाराष्ट्र पोलीस नियमावली 1999 प्रशासन भाग-1, प्रकरण 12 वर्तणूक व शिस्त नियम क्र. 419 (1)(2)(3)

2) महाराश्ट्र षासन, सामान्य प्रशासन विभाग  मंत्रालय मुंबई यांचेकडील  परिपत्रक दि. 28.5.1993.

 पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथील महिला प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई सत्र क्रं 28 मधील नवप्रविष्ठ महिला पोलीस प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांच्या साठी खालील प्रमाणे आचार संहिता तयार करण्यात आली आहे. सदरची आचार संहिता मुलभूत प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी व प्रशिक्षण शिस्तबद्ध पध्दतीने होण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी उत्तम प्रकारे प्रशिक्षण आत्मसात करून परिपूर्ण महिला पोलीस शिपाई तयार होवून महाराशष्ट्रात पोलीस दलाची प्रतिमा उज्वल करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे.

 सदर आचार संहितेचे सर्व प्रशिक्षणार्थीनी काटेकोरपणे पालन करावे. हया आचार संहितेचे उल्लंघन केल्यास /पालन न केल्यास संबंधीत प्रशिक्षणार्थींवर शिस्तभंगाची कठोर कारवाई  करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच कसूरीचे स्वरूप  पाहून संबंधीत प्रशिक्षणार्थींना सेवेतून बडतर्फ / काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल.

बाथरुम टॉयलेट:-

  1. प्रशिक्षणार्थी यांनी बाथरुम, टॉयलेट व वॉश बेसीन यांची स्वच्छता ठेवावी-
  2. टॉयलेटमध्ये पाण्याचा जास्त वापर करावा.
  3. प्रशिक्षणार्थी यांनी कपडे धुण्याच्या ठिकाणीच कपडे धुवावेत. कपडे धुण्यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.
  4.  टूथपेस्ट लावून बॅरेकच्या जवळ थुंकू नये. फक्त स्वच्छता गृहात ब्रश करावा.
  5. प्रशिक्षणार्थी यांनी त्यांना नेमुन दिलेलेच स्वच्छतागृहाचा वापर करावा.

भोजनालय:-

  1. भोजनालयाचे काम पाह-यासाठी प्रशिक्षणार्थी यांचेमधूनच 05 सदस्यांची भोजनालय कमेटी नेमण्यात येईल.
  2. भोजनालय कमेटी भोजनालयाच्या सर्व कामकाजावर देखरेख ठेवून तेथील व्यवहार पारदर्शक   राहतील याकडे लक्ष  ठेवेल.
  3. जेवण व  नाष्ट्याची वेळ खालील प्रमाणे असेल. त्यावेळेमध्येच प्रशिक्षणार्थी यांनी त्यांचा चहा, नाष्टा व जेवण घ्यावे.

सकाळचा चहा

०५ : ३०   ते    ०५ : ४५

सकाळचा नाष्टा

०७  : ३०  ते    ०८ : ३०

चहा

१०  : ४५  ते    ११ : ००

दुपारचे जेवण

१३ : १५   ते    १४ : ५०

सायंकाळचा अल्पोपहार

१७ : १०   ते    १७ : १५

रात्रीचे जेवण

१९ : ००   ते    १९ : ४५

  1. सर्व प्रशिक्षणार्थी यांनी रांगेत जेवण घ्यावे. एका ताटामध्ये दोन प्रशिक्षणार्थी यांनी जेवू नये.
  2. प्रशिक्षणार्थी यांनी जेवण करताना चपातीच्या कडा काढू नयेत. पुर्ण चपाती खावी. तसेच जेवताना भाजी, कांदा, कडीपत्ता ताटाच्या बाहेर (टेबलवर) टाकू नये. स्वतःच्या ताटातच एका बाजूस गोळा करुन नंतर त्या डस्टबीन मध्ये टाकाव्यात. जेवणाचा टेबल स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.
  3. प्रशिक्षणार्थी यांनी जेवण वाया घालवू नये. पाहिजे असेल तेवढेच अन्न वाढून घ्यावे. ताटामध्ये उरलेले खरकटे कचरा पेटीत व्यवस्थितरित्या टाकावे. वॉश बेसीन, टेबलवर किंवा इतरत्र टाकून अस्वच्छता करू नये.
  4. प्रशिक्षणार्थी यांनी पिण्याच्या पाण्याचा वापर जपून करावा. पाण्याच्या टाकी जवळ खरकटे ताट धुवून अस्वच्छता करु नये.
  5. भोजनालयात शांतता व स्वच्छता ठेवावी. वातावरण प्रसन्न ठेवावे.
  6. प्रशिक्षणार्थी यांनी जेवण झाल्यावर खुर्ची पुढे ढकलून व्यवस्थित ठेवावी.
  7. भोजनालय कर्मचाऱ्यांशी प्रशिक्षणार्थी यांनी आदराने वागावे. काही अडचणी असल्यास भोजनालय व्यवस्थापक व कमेटी मेंबर यांना सांगावे.
  8. भोजनालयात प्रवेष करताना स्वतःचे बुट/शुज हे शुज रॅक मध्येच ठेवण्यात यावेत.                
  9. प्रशिक्षणार्थी यांनी जेवण करताना खालील प्रमाणे गणवेश परिधान करावा.
  10. सकाळचा नाश्टा व दुपारचे जेवण – खाकी पॅंट,स्वच्छ पांढरा शर्ट (परेड, गेम, वर्कींग आदेशाप्रमाणे)
  11. सायंकाळचे जेवण – मुफ्ती ड्रेस.
  12. जेवणाबाबत अभिप्राय/तक्रार असल्यास त्यांची नोंद नोंदवहीत करावी. तसेच तक्रार पेटीमध्येही स्वतःचे नाव किंवा स्वाक्षरी नमूद न करता सुचना टाकू शकता.

आंतरवर्ग प्रशिक्षणाबाबतच्या सुचना :-

  1. प्रशिक्षणार्थी यांनी वर्गात झोपू नये.
  2. संबंधीत आंतरवर्ग प्रशिक्षकांच्या पूर्व परवानगी शिवाय प्रशिक्षणार्थी यांनी आंतरवर्गातून बाहेर जावू नये.
  3. प्रशिक्षणार्थी यांनी आंतरवर्गात नेमून दिलेल्याच ठिकाणी बसावे.
  4. आंतरवर्गात प्रशिक्षक शिकवित असताना प्रशिक्षणार्थी यांनी वर्तमानपत्र, कादंबरी, मासिक व संबंधीत विषया व्यतिरिक्त इतर मजकूरांची पुस्तके आणू नयेत व वाचू नयेत. लिहून देण्यात येणारा अभ्यास त्या त्या वेळी उतरून घ्यावा.
  5. खाद्य पदार्थ वर्गात आणू नये / खावू नये.
  6. आंतरवर्गात मोबाईल, कॅमेरे, आयपॉड इत्यादी उपकरणे आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे.

परिक्षा:-

  1. चाचणी/मध्यकालीन/अंतिम/अंतिमपूर्व व इतर परिक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची कॉपी अगर गैरप्रकार करताना आढळून आल्यास सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक 28 मे 1993 च्या निर्णयान्वये प्रशिक्षणार्थी यांचेवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल व त्यांना मुळ घटकात परत करण्यात येईल.
  2. सर्व उमेदवारांनी प्रत्येक परिक्षेच्या नियोजीत वेळेपूर्वी 15 मिनीटे आपल्या जागेवर/आसन क्रमांकावर बसावे. सर्व प्रशिक्षणार्थींनी परिक्षेस बसण्यापूर्वी त्यांचेजवळ असणाऱ्या नोटस्, पुस्तके ई.साहित्य हॉलच्या बाहेर ठेवावे.
  3. उत्तर पत्रिका/पुरवणी उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर राखून ठेवलेल्या जागेत नमूद केलेल्या क्रमांकानुसार उमेदवाराने नांव, विशय, आसनक्रमांक व परिक्षा केंद्र, इत्यादी तपषील स्पश्टपणे लिहावा. त्याची मागील बाजू कोरी सोडावी.
  4. उत्तर पत्रिका फक्त निळया शाईने लिहावी.

वाचनालय:-

  1. वाचनालयाच्या नेमून दिलेल्या वेळेतच पुस्तके घेण्यासाठी, जमा करण्यासाठी जावे.
  2. वाचनालयातून देण्यात आलेली पोलीस मार्गदर्शिका व ईतर पुस्तके जपून हाताळावीत, पुस्तकांमध्ये काहीही लिहू नये, पाने  वगैरे फाडू नये व फाटल्यास त्यानुसार दंड आकारण्यात येईल. पुस्तक गहाळ झाल्यास किंवा हरवल्यास त्याचा दंड आकारण्यात  येईल.

शस्त्रागार:-   

शस्त्राची मोडतोड होणार नाही किंवा शस्त्राचे पार्टस् गहाळहोणार नाहीत याची दक्षता घ्यावी. शस्त्राचे नुकसान झाल्यास भरपाई वसुल करण्यात येईल व निश्काळजीपणे षस्त्र हाताळल्याचे निष्पन्न झाल्यास त्याबाबत कारवाई करण्यात येईल.

मोची:-

      ठरवून दिलेल्या वेळेतच बुट पॉलीश व दुरूस्तीसाठी जावे. इतर वेळी जावू नये.कोणीही पैसे देवू नये.

धोबी:-

हया केंद्रामध्ये धोब्याची सेवा उपलबध असून प्रत्येक प्रषिक्षणार्थी यांनी धोब्याकडे गणवेश, पीटी ड्रेस, मुफ्ती ड्रेस             नेमून दिलेल्या वेळेतच धुण्यासाठी/ ईस्त्रीसाठी दयावा इतर वेळी देवू नये. प्रशिक्षणार्थी यांनी धोब्याकडे धुण्या करिता व इस्त्री करिता देण्यात येणाऱ्या कपडयाची नोंद वेळोवेळी विहीत नमुन्यात डायरीमध्ये करावी . प्रत्येक  प्रशिक्षणार्थीचे 26 जोड कपडे प्रति माह धोब्याकडून धुण व इस्त्री करून देण्यात येतील व त्यासाठी प्रमि माह रू.150/-. प्रषिक्षणार्थी कडून मेस बिला सोबत वसुल करण्यात येईल. कोणीही प्रषिक्षणार्थीने धोब्यास रोख रक्कम देवू  नये.               

सर्वसाधारण सूचना:-

  1. प्रशिक्षणार्थी यांनी अधिकारी/कर्मचाऱ्याशी सभ्यतेने व नम्रतेने वागावे, वरिष्ठ अधिकारी व प्रशिक्षक समोरून येत असल्यास त्यांना सॅल्युट न चुकता करावा.
  2. प्रशिक्षणार्थी यांनी केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांचे वसाहतीमध्ये जावू नये व त्यांचे निवासस्थानी भेटण्यासाठी जावू नये. कामाव्यतिरिक्त प्रशिक्षक यांच्याषी बोलू नये.  स्टाफ रूम मध्ये जावू नये.
  3. प्रशिक्षण केंद्रामध्ये शिवनेरी वस्तीगृह/ बॅरेक्स/ भोजनालय या ठिकाणी सूचना पेटया ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रशिक्षणार्थी यांनी त्यांची काही तक्रार असल्यास किंवा त्यांना काही सुचना करावयाच्या असल्यास स्वतःचे नाव न लिहीता व सही न करता प्रशिक्षणार्थी यांना सूचना करता येतील. त्याकरीता त्यांनी सुचना पेटीचा वापर करावा. तसेच प्रशिक्षणार्थी यांना काही महत्वाच्या सुचना अचानक दयावयाच्या असतील तर त्याबाबत भोजनालयाच्या व नियंत्रण कक्षाच्या जवळ असणाऱ्या नोटीस बोर्डवर लावण्यात येतील. प्रशिक्षणार्थी यांनी नोटीस बोर्ड वरील सुचना वाचण्याची सवय ठेवावी.
  4. प्रशिक्षणार्थी यांची काही वैयक्तीक अडचण/ तक्रार असल्यास प्रषिक्षणार्थी यांनी प्रशिक्षण केंद्रातील महिला अधिकारी पोलीस निरीक्षक यांचेशी समक्ष संपर्क साधावा.
  5. प्रशिक्षणार्थी यांना रविवारी विहीत  वेळेत लोणावळा शहरात बाहेर जाण्यासाठी सोडण्यात येते त्यावेळी मुफ्ती ड्रेस परीधान करावा. शहरात हिंडताना आदर्श वर्तन ठेवावे. नेमून दिलेल्या वेळेत प्रशिक्षण केंद्रात परत यावे.
  6. वर्कींगचे साहित्य काळजीपुर्वक जमा करावे व वेळेत नेमून दिलेले श्रमदानाचे कार्य पूर्ण करावे.
  7. प्रशिक्षणार्थी यांनी स्वतःजवळ रू.500/- पेक्षा जास्त रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू बाळगू नये.
  8.  प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण केंद्रात सायंकाळी 20.00  ते 22.00 वा.पर्यंत फक्त शिवनेरी वस्तीगृह व बॅरेक मध्येच मोबाईल वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मोबाईल चार्ज करण्यासाठी सोय करण्यात आलेल्या ठिकाणीच मोबाईल चार्ज करावेत. त्याकरीता वस्तीगृहातील इलेक्ट्रीक बोर्ड किंवा इतर साहित्याची मोडतोड करु नये असे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल. इतर वेळेत किंवा इतर ठिकाणी मोबाईलचा वापर करू नये .मोबाईलचा वापर करताना आढळून आल्यास मोबाईल फोन जप्त करण्यात येवून कठोर कारवाई करण्यात येईल.
  9.  पावसाळयात प्रशिक्षण सत्रामध्ये रेनकोट, जादा सॉक्सच्या जोडया, बुट, गणवेश ठेवावा.
  10. प्रशिक्षणार्थी यांना औषधोपचारासाठी प्रशिक्षण केंद्राच्या बाहेर जाण्यासाठी परवानगी दिली गेली असल्यास त्यांनी सोबत वॉर्डन यांना घेवून जाणे सक्तीचे आहे.प्रशिक्षणार्थी यांच्या नातेवाईकांना प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात भेटण्यासाठी बोलावता येणार नाही. रविवार व्यतिरिक्त इतर कोणत्याही दिवशी जवळचे नातेवाईक, आप्तेष्ट यांना भेटण्यासाठी बोलावू नये.
  11.  प्रशिक्षणार्थी यांनी आंतरवर्ग व बाहयवर्ग अधिकारी कर्मचारी तसेच कार्यालयीन कर्मचारी यांचेशी वैयक्तिक संबध प्रस्थापीत करू नये.तसेच कोणाही प्रषिक्षकांने प्रषिक्षणार्थीषी वैयक्तीक संबध प्रस्थापीत करू नये.
  12. प्रशिक्षणार्थी यांनी कोणत्याही परिस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थानी जावू नये. तसेच प्रशिक्षक यांनी प्रशिक्षणार्थी यांना कोणत्याही कारणास्तव आपले निवासस्थानी किंवा इतरत्र बोलावू नये.
  13. सर्व वसतीगृहातील खिडक्यांना नवीन पडदे बसविण्यात आले असुन प्रषिक्षणार्थी यांनी सदर पडदे खराब करू नयेत अथवा पडदयांचे नुकसान करू नये.
  14.  प्रशिणार्थी यांनी आपले कपडे खोलीमध्ये  वाळत घालू नयेत. आपले कपडे बाहेर लावलेले तारेवर वाळत घालावेत.
  15.  प्रशिक्षणार्थी यांनी आपल्या चादरी , ब्लेकेट, स्वत न धुता धोब्याकडे धुण्यासाठी द्याव्यात.

कोणत्याही आंतरवर्ग वा बाहयवर्ग प्रशिक्षक हयांचेषी वर्ग वगळता अथवा परेड ग्राऊंड / ड्रीलशेड वगळता इतर ठिकाणी संभाशण करू नये. मोबाईल फोनवर बोलू नये. SMS पाठवू नये. वैयक्तीक संबध प्रस्थापीत करू नये. सदरील बाब आढळल्यास शिस्तभंग विषयक कार्यवाही होवून पोलीस सेवेलाही मुकावे लागेल.

कोणत्याही प्रशिक्षणार्थीला कोणत्याही कारणास्तव त्यांचे युनिटमध्ये पाठविण्याचा अधिकार फक्त प्राचार्यांना आहे. जो पर्यत प्राचार्य प्रशिक्षणार्थीना स्वतः बोलणार नाही तो पर्यत हया बाबत ते निर्णय घेणार नाहीत.

त्यामुळे कोणत्याही प्रशिक्षणार्थीने कोणत्याही इतर व्यक्तीच्या धमकी/ दटावणे/  प्रलोभने/  आमिश/  अनैतिक वर्तन/ पैसे मागणे इत्यादीला बळी न पडता निर्भयपणे, सचोटीने, आचारसंहिते प्रमाणे, एकाग्रतेने आपले प्रशिक्षण पुर्ण करावे.