Skip to content

Manners & Etiquettes

Home | Manners & Etiquettes

Manners & Etiquettes

नवप्रविष्ठ  महिला पोलीस प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई यांच्या करीता प्रशिक्षण कालावधीतील आचार संहिता 

संदर्भ क्रमांकः-    

1) महाराष्ट्र पोलीस नियमावली 1999 प्रशासन भाग-1, प्रकरण 12 वर्तणूक व शिस्त नियम क्र. 419 (1)(2)(3)

2) महाराश्ट्र षासन, सामान्य प्रशासन विभाग  मंत्रालय मुंबई यांचेकडील  परिपत्रक दि. 28.5.1993.

     पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथील महिला प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई सत्र क्रं 28 मधील नवप्रविष्ठ महिला पोलीस प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांच्या साठी खालील प्रमाणे आचार संहिता तयार करण्यात आली आहे. सदरची आचार संहिता मुलभूत प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी व प्रशिक्षण शिस्तबद्ध पध्दतीने होण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी उत्तम प्रकारे प्रशिक्षण आत्मसात करून परिपूर्ण महिला पोलीस शिपाई तयार होवून महाराशष्ट्रात पोलीस दलाची प्रतिमा उज्वल करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे.

     सदर आचार संहितेचे सर्व प्रशिक्षणार्थीनी काटेकोरपणे पालन करावे. हया आचार संहितेचे उल्लंघन केल्यास /पालन न केल्यास संबंधीत प्रशिक्षणार्थींवर शिस्तभंगाची कठोर कारवाई  करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच कसूरीचे स्वरूप  पाहून संबंधीत प्रशिक्षणार्थींना सेवेतून बडतर्फ / काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल.

 • वर्तणूक/ शिस्त :-
 1. पोलीस प्रशिक्षण केंद्र,खंडाळा येथे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होत नाही. जो पर्यंत प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने नोटीस बोर्डवर सूचीत केले जात नाही तोपर्यंत कोणासही कोणतीही रक्कम देवू नये. रक्कम दिल्यास रितसर शासकीय पावती दिली जाईल.
 2. कोणत्याही प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षण घेत असताना आंतरवर्ग व बाहयवर्ग प्रशिक्षणातून प्राचार्य यांच्या परवानगीशिवाय गैरहजर राहता येणार नाही.
 3. मुरभुत प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व असणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थी यांना प्राचार्य यांचे लेखी आदेशाशिवाय प्रशिक्षण केंद्राची हद्द सोडून जाता येणार नाही.   
 4. प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात कोणत्याही कामासाठी जाताना त्यांना सोबत नेमुन दिलेल्या प्रशिक्षणार्थी (छोटी/बडी) शिवाय जावू नये.
 5. रात्रीचे रोलकॉल नंतर प्रशिक्षणार्थीं यांना शिवनेरी/बॅरॅक सोडता येणार नाही.
 6. रनिंग, पी टी साठी प्रशिक्षणार्थी यांनी खाकी फुल पँट / ब्लु ट्रक पँट स्वच्छ पांढरे टी शर्ट, कॅनव्हॉस शूज, सॉक्स असा गणवेश करावा.
 7. समारंभीय परेड व आंतरवर्गासाठी प्रशिक्षणार्थी यांनी खाकी फूल पॅट,खाकी शर्ट,ब्लॅक शूज, ब्लॅक सॉक्स, बेल्ट ,बेरी कॅप,लाईनयार्ड,षिट्टी,नेमप्लेट असा गणवेश करावा.
 1. सर्व प्रकारच्या ड्रिलसाठी प्रशिक्षणार्थी यांनी नेमून दिलेला विहीत गणवेश परिधान करावा.
 2. प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षण केंद्राच्या बाहेर जाताना तसेच इतर वेळी बाहेर जाताना पूर्व परवानगी घेवूनच केंद्राच्या बाहेर जावे तसेच प्रशिक्षण केंद्राचे बाहेर जाताना मुफ्ती ड्रेस परिधान करावा.
 3. प्रशिक्षणार्थी यांनी अेट फिगर प्रमाणे केस रचना करावी. त्यावर काळी जाळी व काळी रिबीन वापरावी तसेच
 4. प्रशिक्षणार्थी यांनी केस मोकळे सोडू नयेत.
 5. संपूर्ण प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी यांनी कोठेही फिरताना स्लीपर / चप्पल घालू नयेत. नेहमी शुज घालावेत.
 • बॅरेकमधील शिस्त :-
 1. महिला प्रशिक्षणार्थींनी आपासात भांडणतंटा, वादविवाद, शिवीगाळ करू नये. इतर प्रशिक्षणार्थी यांचेशी आदरयुक्त भाषेत बोलावे. विभागावरुन (नेमणूकीच्या ठिकाणावरुन) आप-आपसात वाद विवाद करु नये. काही अडचणी आल्यास रेक्टर/वॉर्डन यांना भेटून समक्ष सांगावे.
 2. बॅरेकमध्ये बोलण्याचा आवाज कमी असावा. इतर प्रशिक्षणार्थी यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 3. प्रशिक्षणार्थी यांनी आप आपल्या बॅरेक स्वच्छ ठेवाव्यात. बिस्कीट, वेफर्स, चॉकलेटचे रॅपर तसेच पाण्याच्या बाटल्या कागद इत्यादी टाकाऊ पदार्थ कचरा पेटीतच टाकावेत. ते इतरत्र कोठेही टाकू नये.
 4. प्रशिक्षणार्थी मेसमधून जेवण, नाष्टा व चहा इत्यादी खाण्याच्या वस्तू मेसमधून  शिवनेरी होस्टेलमध्ये वा बॅरेकमध्ये नेता येणार नाही.
 5. कॉटवर एकापेक्षा जास्त प्रषिक्षणार्थींनी बसू नये,उभे राहू नये तसेच कॉटवर उडया मारू नये किंवा कॉट मोडेल असे कोणतेही कृत्य करू नये. असे दिसून आल्यास शिक्षा देण्यात येवून पुर्ण कॉटचे पैसे वसूल केले जातील.
 6. प्रशिक्षणार्थींनी धुम्रपान करू नये,दारू वा अंमली पदार्थचे सेवन करू नये, गुटखा,तंबाखु इत्यादी खावू नये.
 7. प्रशिक्षणार्थी यांनी अश्लिल पोस्टर अथवा आक्षेपार्हे साहित्य जवळ बाळगू नये, प्रदर्शनी कपाटावर किंवा भिंतीवर चिटकविण्यात येवू नये.
 8. परेड/आंतरवर्ग/हजेरीसाठी बाहेर जाताना बॅरेकमधील सर्वात षेवटी जाणा-या प्रशिक्षणार्थी यांनी बॅरेक मधील लाईट व फॅन बंद करावे व लॉक करून चावी डयुटीवर हजर असलेल्या प्रशिक्षणार्थीकडे जमा करावी
 9. प्रशिक्षणार्थी यांनी मौल्यवान वस्तु स्वतःजवळ ठेवू नये. पोश्ट ऑफीसमध्ये बचत खाते उघडून त्यात रक्कम ठेवावी. पैसे चोरी झाल्यास येथील प्रशासन जबाबदार रहाणार नाही. प्रशिक्षणार्थी यांनी कीट पेटीस कुलूप लावावे व बाहेर जाताना व आल्यावर कुलूप बंद असल्याची खात्री करावी.
 10. प्रशिक्षणार्थी यांनी बॅरेक मध्ये कपडे अस्ताव्यस्त वाळत न घालता व्यवस्थित वाळत घालावेत, कपडे वाळत घालताना हॅंगरचा उपयोग करावा.
 11. प्रशिक्षणार्थी यांनी बॅरेकमध्ये दुसऱ्यास लज्जा उत्पन्न होईल असे कोणतेही कृत्य करू नये.
 12. प्रशिक्षणार्थी यांनी बॅरेकमध्ये निंराजन, दिवा, ज्योत व अगरबत्ती इत्यादी लावू नये. आग लागण्याची शक्यता असते.
 13. प्रशिक्षणार्थी यांनी बॅरेकच्या तसेच क्लासरूमच्या भिंतीवर काहीही लिहू नये. कॅलेंडर / पोस्टर चिकटवू नये.
 14. विंचरलेले केस कचरा पेटीमध्येच टाकावेत इतरत्र टाकू नये.
 15. प्रशिक्षणार्थी यांची काही वैयक्तीक अडचण/तक्रार असल्यास प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षण केंद्रातील महिला अधिकारी यांचेषी समक्ष संपर्क साधावा.
 16. रुममध्ये व्हिडीओ कॉलींग करण्यास मनाई आहे.